(Jal Jeevan Mission)
जलजीवन मिशन (JJM) ही भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून तिचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पोहचविणे हे आहे. या योजनेद्वारे घरगुती नळजोडणी (FHTC) उपलब्ध करून देऊन पाण्याचा दर्जा, पुरवठा आणि शाश्वत जलव्यवस्थापन सुनिश्चित केले जाते.