(Pradhan Mantri Awas Yojana – Gramin / PMAY-G)
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, ग्रामीण भागातील सर्व गरीब व बेघर कुटुंबांना “सर्वांसाठी घर” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राबविली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला विज, पाणी, स्वच्छतागृह व गॅससारख्या मूलभूत सोयीसुविधांसह सुरक्षित व कायमस्वरूपी (पक्के) घर दिले जाते.