श्री. मनोज रानडे यांनी १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. मागील मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रोहन घुगे यांना जळगावच्या जिल्हाधिकारी पदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी घेतली. 
या पदाचा कार्यभार स्वीकारताना, श्री. रानडे यांनी प्रशासन अधिक नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर भर देण्याचा आपला ध्यास कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन केले. ते सध्या पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. 
संपर्क माहिती:
  • पद: मुख्य कार्यकारी अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)
  • ईमेल: ceozp[dot]thane[at]maharashtra[dot]gov[dot]in
  • फोन: ०२२-२०८१२९१०
  • पत्ता: जिल्हा परिषद ठाणे